अपंग व्यक्तींच्या विकासासाठी ‘सेन्सरी पार्क’ प्रकल्प

0

पुणे । द पूना ब्लाइंड मेन्स असोसिएशनच्या टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्युटमध्ये (टीटीआय) अपंग व्यक्तींच्या विकासासाठी कै. पद्मश्री निरंजन पंड्या सेन्सरी पार्क हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. प्रकल्पाचे उद्घाटन फोर्ब्ज मार्शलच्या संचालक व या प्रकल्पाच्या निर्मितीत भाग घेणार्‍या एक प्रमुख देणगीदार रती फोर्ब्ज यांच्या हस्ते नुकतेच झाले. यावेळी राज्याचे अपंगत्व आयुक्त नितीन पाटील, नगरसेवक अशोक कांबळे, सुधीर साबळे, जे.पी. बॅनर्जी, नितीन देसाई, परवेझ बिलिमोरिया, किशोर व्होरा आदी उपस्थित होते.

पाटील यांच्या हस्ते या प्रकल्पात वृक्षारोपण करण्यात आले. प्रकल्प साकारण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या संघातील सर्व सहकार्यांचे त्यांनी कौतुक केले. नगरसेवक कांबळे यांनीही कर्णबधीर-अंध मुलांसाठीच्या पार्कचे उद्घाटन केले. व्होरा यांनी सर्वांचे आभार मानले.