अपघातग्रस्तांना सर्व मदत दिली जाईल-मुख्यमंत्री

0

मुंबई- दापोली कृषी विद्यापीठाचे कर्मचारी महाबळेश्वरला पिकनिकला जात असतांना ३२ जण ठार झाले आहे. बसमध्ये ३३ प्रवाशी होते. महाबळेश्वरजवळील पोलादपूर येथील घाटात बस कोसळून झालेल्या अपघातात ३२ जणांचा मृत्य़ू झाला आहे. अपघातस्थळी यंत्रणा पोहोचली असून सर्व प्रकारच्या मदतीसाठी प्रशासन प्रयत्नशील आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

यांच्यामुळे मिळाली ३२ जण ठार झाल्याची माहिती !

या अपघातात  सुदैवाने एका प्रवाश्याने उडी मारल्याने ते बचावले. बस ज्या दरीत कोसळली त्या दरीत अपघात झाला आहे असे कोणाला कळले देखील नसते परंतू ज्या प्रवाश्याचा जीव वाचला आहे त्यांच्यामुळे ही घटना समोर आली.

प्रकाश सावंत असे या प्रवाश्याचे नाव आहे. त्यांनी जखमी अवस्थेत कसबसे बाहेर येऊन कृषी विद्यापीठात फोन करून बसला अपघात झाल्याचे सांगितले. प्रकाश सावंत यांना आता उपचारासाठी पोलादपूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते दापोली विद्यापीठात सहाय्यक अधीक्षक म्हणून काम करतात.

शनिवार आणि रविवार अशी जोडून सुट्टी आल्याने कृषी विद्यापीठाचे कर्मचारी महाबळेश्वरला सहलीसाठी निघाले. सकाळी ६.३० च्या सुमारास त्यांनी बसच्या बाहेर अत्यंत उत्साहात फोटोही काढला. पुढे त्यांच्या आयुष्याचा काळ उभा आहे याची कल्पना त्यांना नव्हती.
या ठिकाणी NDRF चे पथकही बचाव कार्यात सहभागी झाले आहे. ३३ कर्मचाऱ्यांपैकी ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. बसचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. तर अनेक मृतदेही छिन्न विछिन्न अवस्थेत आहेत. हे सगळे मृतदेह बाहेर काढण्यात पाऊस आणि धुक्यामुळे अडथळे येत होते. आत्ताही या दरीत दाट धुके आहे अशी माहिती समोर येते आहे.