यावल- अंकलेश्वर-बर्हाणपूर राज्य मार्गावर अपघातग्रस्त डंपरचे टायर चोरी करणार्यास यावल पोलिसांनी बेड्या ठोकल्या. कृष्णा शंकर कोळी (रा.भालशीव) असे संशयीताचे नाव आहे. 16 मे रोजी रात्री नऊ वाजता वाळूने भरलेला डंप (एम.एच.19 झेड.5858) घेवून चालक सचिन कोळी (रा.फुफनगरी, ता.जळगाव) हा अंकलेेश्वर-बर्हाणपूर राज्य मार्गावरून यावलकडे येत असताना किनगावजवळील हॉटेल मनमंदिरच्या समोर भरधाव वाहनावरील ताबा सुटल्याने डंपर थेट निंबाच्या झाडावर धडकले होते तर तीन जखमीही होते व एकाचा उपचारादरम्यान मृत्यूही ओढवला होता. अवघातानंतर वाहन घटनास्थळीच पडून होते. याचा फायदा घेत संशयीत आरोपी कृष्णा शंकर कोळी (रा.भालशिव, ता.यावल) याने अपघातग्रस्त डंंपरचे दोन टायर, डिस्क व ड्रम असा एकुण 45 हजाराचा मुद्देमाल लांबवला व तो आपल्या ट्रॅक्टरच्या ट्रालीस वापरला. या प्रकरणी सचिन कोळी (रा.फुफनगरी) यांच्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल होता. गुन्ह्याचा तपास करतांना पोलिस निरीक्षक डी.के.परदेशी, सहाय्यक फौजदार अजीज शेख, हवालदार सुनील तायडे यांनी संशयीत कृष्णा कोळीस ट्रॅक्टर ट्राली सह ताब्यात घेतले आहे. ट्रॉलीस लावलेले टायर व डिक्स, ड्रम हे डंपरचे असल्याचे उघड झाले आहे.