साक्री । दहावीच्या विज्ञान पेपरासाठी जात असताना साक्री-पिंपळनेर रस्त्यावरील कासारे फाट्याजवळ आज सकाळी 9 वाजता मोटरसायकल स्वार दोन विद्यार्थी एसटीच्या मागे धडकल्याने जखमी झाले. साक्री ग्रामीण रुग्णालयात उपचार देण्यात आले व विद्यार्थी गौरव अनिल बहिरम याला पायाला 3 टाके पडले व निखिल संजय अहिराव या विद्यार्थ्याच्या पायाला 2 टाके पडले आहेत. दोघांनाही पायाला दुखापत झाली आहे. मात्र या विद्यार्थ्यांनी पेपर देण्याचा हट्ट धरला होता व 11 वाजता न्यू इंग्लिश स्कुल कनिष्ठ महाविद्यालयात परीक्षा सेंटरवर परीक्षा देण्यासाठी हजर झाले. पेपर लिहण्यासाठी सुरुवात केली जखमी अवस्थेत सुद्धा विद्यार्थी पेपर देण्याची धडपड करीत आहे.