अपघाताची पोस्ट व्हायरल करणार्‍यांवर गुन्हा दाखल

0

चाळीसगाव । गेल्या चार-पाच दिवसापासून जळगाव चाळीसगाव राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाल्याची पोस्ट फिरत आहे. सध्या सोशल मिडीयामुळे खोटी माहिती जोरात पसरत असल्याचे अनेक वेळा निदर्शनात आले आहे. अपघात झाल्याची माहिती सध्या सोशल मीडियात जोरात फिरत असून तरुणांसह वृद्ध, मध्यमवर्षीय इसम देखील त्यांच्या कडे आलेल्या अथवा ग्रुप वरील पोस्ट काहीही शहनिशा न करता प्रसार करीत असल्याने त्याचे अनेक दुष्परिणाम होऊन बदनामी
होत आहे.

मंगळवारी 21 मार्च रोजी जळगाव चाळीसगाव मार्गावर अपघात घडल्याची बातमी सोशल मिडीयातुन पसरत आहे मात्र वास्तव्यात ही घडली नसल्याचे दिसून येत आहे. अफवा पसरवून संभ्रम निर्माण करणार्‍या चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव व तमगव्हाण येथील 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात
आला आहे.

12 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची होती पोस्ट
या तरुणांचा तपास पोलीस निरीक्षक आदिनाथ बुधवंत व पथकाने लावला असून न्यायालयाच्या परवानगीने चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाळीसगाव जळगाव रस्त्यावर भीषण अपघात होऊन त्यात 12 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची पोस्ट व मयताचे फोटो व्हाट्सअप ग्रुप वर वायरल झाले होते त्यामुळे जिल्हा भरात मोठी खळबळ उडाली होती. त्यामुळे पोलीस व प्रशासनाला याचा मोठा त्रास झाला होता. या पोस्ट वायरल करणार्‍यांचा सुगावा लागत नसल्याने यंत्रणा देखील कमालीची त्रस्त होती. अफवा पसरविणार्‍यात सुभाष पंडित काकडे, प्रवीण लहू निकम व तमगव्हाण येथील प्रवीण नाना निकम, अमोल संजय पवार आदींचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले असून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक अंबादास बोरसे यांच्या फिर्यादीवरून वरील चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे