अपघातातील जखमीचा अखेर मृत्यू

0

जळगाव। दुचाकी घसरून बिलवाडी येथील प्रौढाचा अपघात झाला होता. जखमी प्रौढास जिल्हा सामान्य रूग्णालयात 23 जुलै रोजी उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, आज गुरूवारी पहाटे 3.45 वाजेच्या सुमारास जखमी प्रौढाचा उपचार घेत असतांना मृत्यू झाला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तालुक्यातील बिलवाडी येथील किसन शिवदास पावरा (वय-45) हे दुचाकीवरून जात असतांना शिरसोलीजवळ त्यांची दुचाकी अचानक घसरुन ते यात गंभीर जखमी झाले होते. किसन पावरा यांच्या मृत्यूची माहिती नातेवाईकांना कळताच त्यांनी रूग्णालयात एकच गर्दी करत आक्रोश केला. यानंतर शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून प्राथमिक तपास संजय सोनवणे हे करीत आहेत.