अपघातातील जखमी महिलेचा मृत्यू

0

पुणे । बाणेर गाव रस्त्यावर रस्ता ओलांडण्यासाठी डिव्हायडरवर उभे राहीलेल्या पाच जणांना भरधाव कारने दिलेल्या धडकेत जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान सोमवारी रात्री मृत्यू झाला. पुजा अजयकुमार विश्वकर्मा (वय 24) असे तिचे नाव आहे. पोलिसांनी मंगळवारी सकाळी कारचालक सुजाता जयप्रकाश श्रॉफ (वय 50, रा. आपटे रोड) हिला अटक केली आहे.

शेख व विश्वकर्मा कुटुंबीय डी मार्टमध्ये खरेदी करून घरी जात होते. रस्ता ओलांडण्यासाठी डीव्हाडरवर उभे असताना भरधाव वेगातील सुजाताचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट दुभाजकावर चढून या पाच जणांना उडवून खांबाला जाऊन धडकली होती. यामध्ये तीन वर्षीय इशा विश्वकर्मा हिचा जागीच मृत्यू झाला होता. इशिताची आई पुजा हिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. दम्यान रात्री तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी इतर तिघांवर उपचार सुरू असून, साजित शेख याची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी चतुःश्रुंगी पोलीस अधिक तपास करीत आहेत.