अपघातातील जखमी विलास पाटील यांचे निधन

0

अमळनेर । तालुक्यातील नीम येथील रहिवासी विलास लोटन पाटील (ह.मु. शिरपुर) हे आपल्या नातेवाइकांसह पावागड येथे देवी दर्शन करुन परतीचा प्रवासातील वाहन क्र.(एमएच 18-3663) या बोलेरो गाडीला 21 ऑगस्ट रोजी गुजरात पावागडहुन परत येताना बढोली येथे ट्रकने धडक दिल्याने चार जण जागीच ठार झाले होते. त्यात कविता विलास पाटील, विलास पाटील यांचे साडू सुनील पुंडलिक पाटील, यामिनी सुनील पाटील यांच्यासह गाडीचा चालक ज्ञानेश्‍वर अहिरे हे चार जण जागीच ठार झाले होते. विलास पाटील, उदय पाटील, राजनंदिनी विलास पाटील, कनक सुनिल पाटील, शिला सुनील पाटील हे गंभीर जखमी झाल्याने यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते.

आता मृतांचा आकडा पाच वर
विलास लोटन पाटील (वय-35) यांचे 31 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12 वाजता बडोली गुजरात येथील दवाखान्यात उपचार चालू असतांना दुखत निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा निम येथून राहत्या घरापासून दुपारी 4:30 ते 5 नंतर निघेल. त्या अपघातात स्वर्गीय विलासची पत्नी, वर्डि येथील साडू अ‍ॅड. सुनिल पाटील गुर्जर व मुलगी सह वाहन चालक असे चार व्यक्ती मृत झाले होते. त्यातील गंभीर अवस्थेत असलेल्या विलासचेही नुकतेच निधन झाल्याने मृतांचा आकड पाच झाला.