अपघातात दाम्पत्य ठार

0

पुणे । महिंद्रा पिक-अप आणि दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीवरील पती-पत्नी ठार झाल्याची घटना कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावरील नर्‍हे गावाजवळ सोमवारी सकाळी 11.30 वाजता घडली. याप्रकरणी पिक-अप चालकावर सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुंदा सुरेश वरपे (वय 45) आणि तिचे पती सुदाम भिकाजी वरपे (वय 50 रा. वडगाव) यांचा मृत्यू झाला. पिक-अप चालक सैतानसिंग भाटी हा अपघातस्थळी टेम्पो सोडून फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. वरपे दाम्पत्य दुचाकीने कात्रज नर्‍हे गावाजवळून जात असताना समोरून भरधाव वेगात आलेल्या पिक-अपने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी तातडीने दोघांनाही जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.