पुणे । दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) रस्त्याने दुचाकीवरून जाणार्या दीपक जयस्वाल (वय-30, रा. कात्रज) याचा ट्रकने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांत अज्ञात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तर दुसर्या घटनेतही भरधाव ट्रकच्या धडकेत निलम बबन तुरकमारे (वय 24, रा. विमाननगर) हिचा मृत्यू झाला. ही घटना मंतरवाडी परिसरात शुक्रवारी दुपारी अडीच वाजता घडली. अपघातात जखमी झालेला निलमचा साथीदार जावेद शेख (वय 26, रा. घोरपडी पेठ) याने याप्रकरणी हडपसर पोलिसांत फिर्याद दिली आहे. याप्रकरणी ट्रकचालक अंकुश बाळकृष्ण शिंदे (वय 48, रा. हडपसर) याला अटक करण्यात आली आहे.