अपघातात मजूर जखमी; रिक्षाचालक धावला मदतीला

0

जळगाव । इच्छादेवी चौफुलीजवळच्या सिमेंट गोडाऊनमध्ये महामार्ग क्र 6 वर हात मजुरी करणार्‍याचा अपघात झाला आहे. महामार्गावरून वेगाने जात असलेल्या आटो रिक्षाने धडक दिल्याने जबर जखमी झाला आहे. या आपघातात डोक्याला मार लागल्याने बेशुद्ध अवस्थेत मजूर रस्त्यावर पडून होता. हा मजूर पाचोरा तालुक्याचा असून आपला उदरनिर्वाह चालण्यासाठी तो कामासाठी जळगाव शहरात येत होता.

अर्ध्या तासानंतर दवाखान्यात केले दाखल

शहरातील इच्छादेवी चौफुली जवळच्या सिमेंट गोडाऊन येथे काम करणारा समाधान आनंदा हटकर वय -27 हा महामार्गावर रस्ता ओलांडत असताना आटो रिक्षाने धडक दिल्याने जबर जखमी झाला. या अपघातात हाता पायाला व डोक्याला जबर मार लागल्याने बेशुद्ध अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडून होता. अपघात झाल्यानंतर धडक दिलेला रिक्षा चालक घटनास्थळावरून पसार झाला. रस्त्यावर चालणार्‍या नागरिकांना मद्यपान करून तरूण पडलेला असेल अशी शंका घेवून जखमी समाधान याला कोणीही उचलण्याची तयारी दाखवली नाही. यावेळी महार्गावरवरून जात असलेल्या रिक्षा चालक मनोहर शिंदे डोक्यातून रक्त वाहत आहे आणि अपघात झाला असल्याचे लक्षात आल्या नंतर तात्काळ आपल्या रिक्षामध्ये टाकून उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. रिक्षा चालकाच्या माणुसकीने अर्ध्या तासाने का होईना जखमी समाधान हटकर चे प्राण वाचले आहे.

महामार्गावर अपघात अपघाताची संख्या वाढली आहे. महामार्ग क्र 6 च्या वर अनेकांना प्राण गमवावे लागले आहे. या संदर्भात जळगाव शहरात कृती समिती देखील पुढील संघर्षा साठी स्थापन करण्यात आलेली आहे. समांतररस्त्यानं साठी बराच काळ जाणार आहे मात्र महार्गावर कार्यरत असलेली यंत्रणा गेली कुठे?