अपघातात महिलेचा मृत्यू

0

बारामती । टेम्पो आणि क्रुझर गाडीच्या अपघातात जेजुरी येथे देवदर्शनासाठी निघालेले दहा विटभट्टी कामगार जखमी झाल्याची घटना मंगळवारी इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथे घडली होती. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून एका महिलेची प्रकृती गंभीर आहे.

शांताबाई मोहिते असे मृत महिलेचे नाव आहे. तर कमलाबाई मोहिते यांची प्रकृती गंभीर आहे. राजु मोहिते, नितीन मोहिते, बाळू मोहिते, प्रकाश मोहिते, कमलाबाई मोहिते, कविता मोहिते, शीतल मोहिते, विमल मोहिते, रेखा मोहिते सर्वजण (रा. आंबेजोगाई जि. बीड) अशी जखमींची नावे आहेत. हे सर्वजण गोपीनाथ लहुदास मुंडे (वय 27 रा. बीड) यांच्या गाडीतून मंगळवारी दुपारी 12 च्या सुमारास खंडोबाच्या दर्शनासाठी जात होते. सणसर गावच्या हद्दीत इंदापूरकडे जाणारा टाटा टेम्पो हेलकावे खाऊन त्यांच्या गाडीवर आदळला. या अपघातात 10 जण जखमी झाले.