अपघातात महिलेचा मृत्यू

0

पुणे । कात्रज-कोंढवा रोडरील शत्रुंजय चौकात कंटेनरने धडक दिल्याने दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री झाली. शारदा विजय सारडा (वय 54, रा. कात्रज), असे मृत महिलेचे नाव आहे.

शारदा या पतीसोबत दुचाकीने जात होत्या. त्यावेळी त्यांच्या दुचाकीला अज्ञात कंटेनरने धडक दिली. यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात अज्ञात कंटेनरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.