अपघातात महिलेचा मृत्यू

0

हडपसर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शेवाळवाडी येथे पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने एका महिलेला चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे. तिच्या डोक्याचा चेंदामेंदा झाल्याने तिची ओळख पटणे मुश्किल झाले आहे. तांबूस काळपट रंगाची साडी, मंगळसूत्र, हातातील बांगड्या व पायातील पैंजण असे महिलेचे साहित्य पोलिसांनी ओळख पटविण्याकरीता ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर रोड राष्ट्रीय महामार्गावर शेवाळवाडी येथे एका अज्ञात महिलेला कोणी तरी अज्ञात वाहनाने धडक देऊन पळून गेल्याची घटना घडली. राष्ट्रीय महामार्ग व अंधाराचा परिसर असल्याने अनेक वाहने तिच्या अंगावरून गेली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक पी. एस. शेंडगे पुढील तपास करीत आहेत.