पुणे-मुंबई महामार्गावर विचित्र अपघात
कामशेत : जुना मुंबई पुणे महामार्गावर कामशेत हद्दीत पुणे कडे जाणार्या मालवाहतूक रिक्षा टेम्पोला मागून कंटेनरची धडक बसली. रिक्षा टेम्पो पुढे जाणार्या दुसर्या कंटेनर वर आदळून झालेल्या अपघातात मालवाहतूक रिक्षा टेम्पो चालकाच्या मांडीत रिक्षाचे हँडल घुसले. तर वाहनाचे मोठे नुकसान झाले. सामाजिक कार्यकर्ते व वन्यजीव मित्र अनिल आंद्रे, कैसर शेख, डॉ. दीपक जाधव, डॉ. श्रीराम शिरसाट व इतरांनी बरेच प्रयत्न करुनही हँडल बाहेर काढता आले नाही. वाहनाचे हँडल हँक सो ने कट करून हँडलसह टेम्पो चालकाला खासगी रुग्णालयात दाखल केले. वेळीच शत्रक्रिया करून टेम्पो चालकाचे प्राण बचावले.
हे देखील वाचा
कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कामशेत हद्दीत निसर्ग ढाबा जवळ गुरूवारी ( दि.13 ) रोजी रात्री नऊ ते साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कांदे विकून पुणे कडे निघालेला मालवाहतूक रिक्षा टेम्पोला ( एमएच 12 एलटी 7164 ) ला कंटेनर (एमएच 06 एक्यू 7937 ) ची पाठीमागून जोरात धडक बसली असता तो पुढे जाणार्या कंटेनर वर जोरात आदळला. या विचित्र अपघातात रिक्षाचालक शहाबाद बरकत अली ( वय 33 रा. गुलटेकडी, पुणे ) याच्या मांडीत रिक्षाचे हँडल घुसले. बरेच प्रयत्न करुनही हँडल बाहेर काढता न आल्याने हँडल कट करून हँडलसह चालकाला कामशेत येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर शस्त्रक्रिया करून ते हँडल काढण्यात यश आले.