जळगाव : समाजामध्ये वाहनांबाबत कायदे मोडण्याची जीव घेणी स्पर्धा सुरू आहेे. अविचाराने वाहन चालविल्याने रस्ता अपघात होत असतात. कायद्याचे पालक करणे हे आपल्या हातात असते. परंतू कायद्यांचे पालनच आपण करीत नाही. त्यामुळे लोकसहभागातुनच हे वर्ष अपघातमुक्त करण्याचा संकल्प आपण सर्वांनी करावा असे आवाहन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी केले.जळगाव जिल्हा पोलीस दल व उपप्रादेशिक परिवहन विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजीत रस्ता सुरक्षा अभियान-2017 चे उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमूख अतिथी म्हणून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांण्डेय, जिल्हा सरकारी वकिल ऍड. केतन ढाके, पोलीस अधिक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, उपवनविभागीय अधिकारी आदर्शकुमार रेड्डी, उप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, डीवायएसपी (आयपीएस) निलोत्पन, अप्पर पोलीस अधीक्षका मोक्षदा पाटील, परिविक्षन जिल्हाधिकारी सचिन उंबासे, महारु पाटील, डीवायएसपी सचिन सांगळे उपस्थित आदी मान्यवर उपस्थित होते. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
जिल्हाधिकारी पुढे बोलतांना म्हणाल्या की, डीपीडीसी योजने अंतर्गत आता तालुका स्तरावर वाहन परवाना घेण्यासाठी आरटीओ कार्यालयास टॅबलेट पुरविण्यात येणार आहे. यामुळे वाहनधानकांना या टॅबलेटवर वाहनधारकांना ऑनलाईन परिक्षा द्यावी लागणार आहे. या परिक्षेत पास झाले तरच वाहनधारकांना लायसन्स मिळणार आहेत. त्यामुळे भविष्यात अपघातांच्या प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच वाहनधारकांना वाहन चालविण्याची टेस्ट देण्यासाठी आरटीओ कार्यालयात पुरेशि जागा नसल्याने आता मोहाडी येथे पाच एकच जागा देण्यात येणार आहे. या ठिकाणी वाहनांच्या सर्व चाचण्या घेण्यात येतील असेही यावेळी त्यांनी सांगीतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरटीओ जयंत पाटील यांनी केले. यात त्यांनी रस्ता सुरक्षा अभियानाचा उद्देश स्पष्ट केला. अविचारी अतिवेगाने निष्काळीपणे वाहन चालविणे ही चालकांची विकृत्ती होत आहे. यामूळे अपघात होवुन घरातील कर्त्यांना जीव गमावावा लागण्याचा घटना घडल्या असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. वर्षाला 1 लाख 40 हजार लोक रस्ता अपघातात मृत्यू होत असतात. त्यामूळे रस्ते सुरक्षित बनविण्यासाठी तातळीच्या उपाय योजना करणे गरजेचे असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले. रस्त्यावरील अन्य घटकांशी सौजन्याने प्रत्येकाने वागले तर अपघात टाळता येईल असाही कानमंत्र त्यांनी यावेळी दिला. जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांण्डेय यांनी घाई करून अपघाताव्दारे मृत्यूला आमंत्रित करु नये. तरुणांमध्ये वाहतुक नियमाविलीबाबत जनजागृती करणे अपेक्षीत असल्याचे त्यांनी म्हटले. कार्यक्रमाचे आभार पोनि. अनिल देशमूख यांनी मानले. यानंतर शहर वाहतुक प्रांगणात जनजागृतीपर पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
अनामिक घाई टाळा
वाहतुक नियमांचे पालन करुन घेणार्या पोलीसांपेक्षा वाहतुक नियम आपल्यासाठी आहे ही भावना जनतेमध्ये निर्माण होणे महत्वाचे आहे. ट्रॅफिक आणि वाहुतीकचे नियम पाळणे महत्वाचे असुन अनामिक घाई टाळावी तसेच वाहतुक नियम सर्वांसाठीच आहेत मात्र हे नियम वाहनधारकांतून तोडले जातात. वाहतुक सुरक्षा आपल्यासाठीच आहे. प्रत्येकाने घाईबाजूला सारून वाहन चालवावे जीवाशी खेळ करू नये. प्रत्येक वाहनधारकाने वाहन हळू चालवावे व नियमांचे तंतोतंत पालन करावे, असा सल्ला अप्पर पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी केले आहे.
80 टक्के अपघात चालकांच्या चुकीमुळे
ट्रॅफिकचा संकल्प आयुष्यभर करावा यासाठी सुरक्षा अभियान आहे. यातच शहर व जिल्ह्याचा विचार करता महामार्ग देखील सिंगल लाईन आहेत. तर रस्तेही अरूंद असून वाहनांना पार्किंगसाठी जागा नाहित. 80 टक्के अपघात हे चालकांच्या चुकीमुळेच होतात समोर आले आहे. महामार्गावर हेल्मेट, सिट बेल्टसह नियमावली पाळली जात नाही. ही बंडखोर वृत्ती विधायक कामाला वापरावे. ज्यावेळेस पोलीस नसतांना नागरीक झेब्रा क्रॉसींगचे नियम पाळतील तेव्हाच जळगाव स्मार्ट सिटी होईल असे मत पोलीस अधिक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी व्यक्त केले.