अपना बँकेला दोन पुरस्कार

0

मुंबई । एफसीबीए व बँकिंग फ्रंटियर्स् यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी उत्कृष्ट सहकारी बँकांना विविध श्रेणी व वैशिष्ट्यांसाठी पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यावर्षी अपना सहकारी बँकेस ग्रीन इनिशीटीव्ह-पेपरलेस व बेस्ट आयटी हेड या दोन श्रेणीतील पुरस्काराने गौरविण्यास आले. याबाबत बोलताना अपना बँकेचे अध्यक्ष दत्ताराम चाळके म्हणाले की, बँकेने आजवर एफसीबीए व बँकिंग फ्रंटियर्स् यांच्या विविध श्रेणीतील पुरस्कार पटकावले आहेत.

पेपरलेस बँकिंगचे उद्दिष्ट केले साध्य
संचालक मंडळाने पेपरलेस बँकिंग करण्याचा निर्णय दोन वर्षापूर्वीच घेतला होता. तसेच बँकेचे स्वतःचे डेटा सेंटर असल्याने अनेक व्यवहार त्या माध्यमातूनच केले जातात. तांत्रिक बाबतीत बँक सक्षम असून बँकेतील कर्मचारीच या बाजू सांभाळतात. बँकेच्या उप प्रमुख व्यवस्थापक, आयटी हेड स्वाती माने यांना बेस्ट आयटी हेडचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. याचा विशेष आनंद होत आहे व आजवर बँकेच्या सभासद व कर्मचार्‍यांंनी दिलेल्या पाठींब्यामुळेच हे शक्य झाले आहे असे चाळके यांनी नमूद केले.