मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वडाळ्यात युवा संवाद कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार युवकांशी संवाद साधत आहे. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना तसेच तरुणांना मार्गदर्शन केले. युवकांनी त्यांच्या मनातील प्रश्न आणि रोजगारासंबधी प्रश्न केले, त्यावर त्यानी उत्तरे दिलीत. यावेळी शरद पवारांनी तरुणांना जीवनात अपयश आले तरी नाउमेद होऊ नका, अपयशातून सावरून उमेदीने कामाला लागल्याचा सल्ला दिला.
भविष्य घडविण्याचे ताकद तरुणांमध्ये आहे. त्यामुळे तरुणांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शैक्षणिक अडचणीत असलेल्या युवकांच्या प्रश्नांसाठी सरकारशी चर्चा करू आणि युवकांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी सरकारला भाग पाडू असे शरद पवारांनी यावेळी सांगितले.
मोठ्या पदावर गेलेत तरी पाय जमिनीवर ठेवा, परिस्थिती समजून घेऊन पाऊले टाकावीत असा सल्लाही पवारांनी यावेळी दिला.
हरलो तरी नाउमेद व्हायचे नाही