‘अपयशी पालकमंत्री’ बॅनरखाली कॉंग्रेसचे उद्या आंदोलन

0
पुणे : जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या विरोधात कॉंग्रेस पक्षाचे उद्या ( शुक्रवारी )बापटांच्या मतदारसंघात बेलबाग चौकात आंदोलन केले जाणार आहे. अपयशी पालकमंत्री अशा बॅनरखाली हे आंदोलन होणार आहे. २४ तास पाणीपुरवठ्याची फसलेली योजना, पीएमपीचा ढासळलेला कारभार , पाणीकपात, दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्ती असे विषय मांडले जाणार असून रेशन परवाना प्रकरणात न्यायालयाने बापट यांच्या निर्णयावर ताशेरे झोडले. या प्रकरणात बापट यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली जाणार आहे.
उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने बापट यांनी मंत्रीपदाचा गैरवापर केला असे ताशेरे मारले आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बापट यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी निदर्शने केली. पक्षाचे प्रदेश सचिव संजय बालगुडे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना निवेदन देऊन बापट प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. काँग्रेस पक्षातील काहींचे बापट यांच्याशी साटेलोटे आहे असा आरोप बालगुडे यांनी केला होता आणि बापट यांच्या विरोधात आंदोलन का होत नाही असा सवाल केला होता.