राष्ट्रवादीचा आरोप
मुंबई :- केंद्र आणि राज्य सरकार काश्मीरमध्ये शांतता राखण्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरले आहेत त्यातून स्वत:ला वाचवण्यासाठी भाजपाने सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. जम्मू-काश्मीरमधील पीडीपीसोबतची युती तोडण्याचा निर्णय भाजप सरकारने आज घेतला त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी भाजपावर जोरदार टिका केली आहे.
चार वर्षाचं केंद्र सरकारचं कामकाज आणि तीन वर्षाचं पीडीपी आणि भाजपचं युती सरकारचं कामकाज हे अपयशी राहिले आहे. परंतु काश्मीरच्याबाबतीत जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्या जबाबदारीतून भाजप मुक्त होवू शकत नाही. केंद्र आणि राज्यामध्ये भाजप सत्ता चालवत असताना या परिस्थितीची जबाबदारी त्यांच्यावरच राहते. ते जरी सरकारमधून बाहेर पडले तरी त्यांना जबाबदारी झटकता येणार नाही असेही नवाब मलिक म्हणाले.