अपर पोलीस अधीक्षकांकडून आढावा

0

भुसावळसह रावेरात मिरवणूक मार्गाची पाहणी ; अधिकार्‍यांना बंदोबस्ताबाबत केल्या सूचना

भुसावळ– महामानवाची जयंती तीन दिवसांवर आली असून यानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून जयंती उत्साहात व शांततेत पार पडण्यासंदर्भात व पोलीस प्रशासनाचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी भुसावळसह रावेरला बुधवारी भेट दिली. याप्रसंगी त्यांनी मिरवणूक मार्गाची पाहणी करून बंदोबस्ताबाबत अधिकार्‍यांकडून आढावा घेतला. भुसावळ येथे झालेल्या बैठकीप्रसंगी सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल, बाजारपेठ निरीक्षक चंद्रकांत सरोदे, शहरचे निरीक्षक दीपक गंधाले, तालुक्याचे निरीक्षक अरुण हजारे, नशिराबादचे सहाय्यक निरीक्षक आर.टी.धारबडे उपस्थित होते. बच्चन सिंग यांनी प्रसंगी प्रत्येक पोलीस ठाण्याने उपद्रवींविरुद्ध किती प्रतिबंधात्मक कारवाया केल्या याची माहिती घेऊन बंदोबस्ताबाबत माहिती जाणून घेतली. भुसावळ शहरातील लिम्पस क्लब ते आंबेडकर पुतळा दरम्यानच्या रूट मार्चची त्यांनी पाहणी केली. बंदोबस्ताबाबतही त्यांनी सूचना केली.

रावेर शहरातही मिरवणूक मार्गाची पाहणी
रावेर– अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी बुधवारी शहराला भेट देत मिरवणूक मार्गाची पाहणी केली. प्रतिबंधक कारवाया करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. जयंती उत्सव समितीची बैठक घेऊन कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे तसेच फैजपूर, यावल पोलीस ठाण्याचे अधिकारी उपस्थित होते.