अपर पोलीस अधीक्षकांनी घेतला कर्मचार्‍यांचा आढावा

0

भुसावळ– शहर पोलीस ठाण्यासह शहर वाहतूक शाखेचे वार्षिक निरीक्षण अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी शुक्रवारी केले. प्रसंगी प्रत्येक कर्मचार्‍यांशी त्यांनी संवाद साधत केलेल्या कामगिरीची माहिती जाणून घेतली शिवाय गुन्हे तपासाबाबत काही सूचना केल्या. सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांची उपस्थिती होती. शहर पोलीस ठाण्याचे व शहर वाहतूक शाखेचे वार्षिक निरीक्षण शुक्रवारी बच्चन सिंग यांच्या उपस्थितीत झाले. सकाळी त्यांनी परेडचे निरीक्षण केले. सकाळी 11 वाजता पोलीस दरबारात त्यांनी प्रत्येक कर्मचार्‍यांना व्यक्तीगत विचारणा करीत त्यांच्या कामाचे स्वरूप आतापर्यत केलेल्या कामांचा आढावा घेतली. आजअखेर किती बक्षिसे मिळाली, आतापर्यतच्या कर्तव्यात काही शिक्षा झाल्या आहे का याची माहिती घेतली. शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले यांनी ही कर्मचार्‍यांच्या कामाची माहिती दिली.