पत्नीही आरोपी ; धुळे एसीबी उपअधीक्षक शत्रुघ्न माळी यांनी दिली फिर्याद
धुळे- उत्पन्नाच्या ज्ञात स्त्रोतापेक्षा जास्त अधिक माया गोळा करणार्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सेवानिवृत्त उपअभियंत्यासह त्याच्या पत्नीविरुध्द देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याने भ्रष्टाचारी अधिकारी-कर्मचार्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
देवपूर पोलिसात पती-पत्नीविरुद्ध गुन्हा
धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शत्रुघ्न देविदास माळी यांनी देवपूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार देवपुरातील मयुर कॉलनीत राहणारे दिनकर मोतीराम पाटील आणि त्यांची पत्नी रजनी दिनकर पाटील यांच्याकडे मिळकतीपेक्षा दोन लाख 34 हजार 71 रुपयांची अपसंपदा जमवली. दिनकर पाटील हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तळोदा, जि.नंदुरबार येथे 1978 ते मार्च 1991 या काळात कार्यरत असताना त्यांनी भ्रष्ट मार्गाने अपसंपदा मिळवल्याचे एसीबीने केलेल्या चौकशीत निष्पन्न झाले. चौकशी अंती दोघां आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक पवन देसले करीत आहेत.