जळगाव :लॉट खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून कानळदा येथील तरुणाच्या अपहरणप्रकरणी मंगळवारी जिल्हापेठ पोलिसांच्या पथकाने नेरी येथील हॉटेलची तपासणी केली. त्यात हॉटेल व्यवस्थापक आणि वेटरचे जबाब घेतले. तसेच हॉटेलचे सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. दरम्यान, दोन कार देखील पोलीसांनी ताब्यात घेतल्या आहेत. कानळदा येथील नीलेश विष्णू भंगाळे याचे प्लॉट खरेदी- विक्रीच्या व्यवहारातून 11 डिसेंबर रोजी अपहरण केले होते. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी 16 डिसेंबर रोजी शरद सपकाळे, सतीश तायडे, प्रवीण शिरसाळे, प्रवीण तायडे, सागर सोनवणे यांना अटक केली आहे. सध्या ते पोलिस कोठडीत आहेत. मंगळवारी जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या पथकाने नेरी येथील हॉटेल मोहिनीची तपासणी केली. तपासात पोलिसांना 13 डिसेंबर रोजी संशयीत आणि फिर्यादी नेरी येथील मोहिनी हॉटेलमध्ये आल्याचे समजले होते. संशयीत आणि फिर्यादी यांनी 13 डिसेंबर रोजी दुपारी हॉटेल मोहिनीमध्ये जेवण केले होते. ते अजिंठा येथे जाणार होते. मात्र ते गेले नव्हते. त्यामुळे मंगळवारी पोलिसांच्या पथकाने मोहिनी हॉटेलची तपासणी कर्मचार्यांचे जबाब घेतले. पोलिसांनी दोन्ही हॉटेलचे सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. दरम्यान, पोलीसांनी याप्रकरणी अगोदर दोन कार ताब्यात घेतल्या होत्या यानंतर आज पुन्हा एमएच.04.डिजे.1366 व एमएच.01.एमए.5746 ह्या दोन कार जिल्हा पेठ पोलीसांनी ताब्यात घेतल्या आहेत.