अपहरणाचे गुन्हे मागे घेण्याची मागणी

0

भुसावळ। येथील रिपाइं कार्यकर्त्यांवर कुठलीही चौकशी न करता पोलीस प्रशासनातर्फे अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले असल्यामुळे हे गुन्हेे मागे घेण्यासाठी रिपाइंतर्फे गुरुवार 18 रोजी उपविभागीय कार्यालया समोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
रिपाइं जिल्हाध्यक्ष नागसेन सुरळकर यांच्या विरुध्द बोदवड पोलीस निरीक्षक बनकर यांनी अपहरणाचे गुन्हे दाखल केले आहे. तसेच चोर्‍या, लुटमार असे अदखलपात्र गुन्हेदेखील दाखल आहे. सुरळकर यांची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी नाही. दारुबंदी, सट्टाबंदी, अवैध गौणखनिज याबाबत त्यांनी प्रशासनाविरोधात आंदोलन केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल केले असल्याचे रिपाइंतर्फे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राजू सुर्यवंशी, मनोहर सुरळकर, आनंद सुर्यवंशी, राजू सुरळकर, प्रमोद तायडे, किशोर वानखेडे, संजय तायडे, राजू इंगळे, सदानंद वाघ, गोविंदा तायडे, सुरेश तायडे, नितीन सुरवाडे, सैय्यद तस्लिम, शेख अल्ताफ शेख फकिरा, महासेन सुरळकर, बिस्मिल्ला तडवी, दिलीप इंगळे, विजय तायडे, रामदास मोरे, सुपडा निकम, नरेश बिर्‍हाडे, इमरान शाह, शेख युसुफ, राहुल मोरे, आसिफ मलिक, विजू माळी, सुभाष इंगळे आदी उपस्थित होते.