जळगाव/अमळनेर- संपादित जमिनीच्या वाढीव मोबदल्यात आर्थिक अपहार केल्याप्रकरणात अटक करण्यात आलेले धुळे शिवसेना महानगर प्रमुख सतीश महाले व माजी नगरसेवक विनायक शिंदे यांना आज जळगावात न्यायालयात हजर केले असता १९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना आज अमळनेर न्यायालयाला सुटी असल्याने जळगाव न्यायालयात हजर करण्यात आले. अमळनेर पोलिसासात रात्री अडीच वाजेच्या सुमारास सतीश दिगंबर महाले, विनायक वालचंद शिंदे, विनोद महाले, धुडकू मोरे या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सतिश महाले यांच्यातर्फे अॅड. अकिल इस्माईल तर शिंदे यांच्यातर्फे अॅड. एसटी दुसाने यांनी काम पाहिले. न्यायमूर्ती एस. जी. ठुबे यांच्या न्यायालयात हे कामकाज चालले.