अपहार भोवला ; किनगाव सरपंचांना चार दिवसांची पोलीस कोठडी

0

यावल- 14 व्या वित्त आयोगाच्या निधीत अपहार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या किनगाव बुद्रुक सरपंच ज्योती अशोक महाजन यांना गुरूवारी यावल न्यायालयासमोर हजर असता प्रथमवर्ग न्यायाधीश डी.जी.जगताप यांनी त्यांना सोमवारपर्यंतची चार दिवस पोलिस कोठडी सुनावली. नोव्हेंबर 2017 मध्ये त्यांच्यासह पसार असलेल्या ग्रामविकास अधिकारी भास्कर रोकडे यांच्यावर 19 लाख 25 हजारांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. संशयीत भास्कर रोकडे यांचा शोध घेण्याकरीता बुधवारी रात्री यावल पोलीस पथक भुसावळ येथे गेले होते मात्र तेथून रोकडे पसार झाल्याचे समजते. तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक अहिरे करीत आहेत.