अपार्टमेंटमध्ये बंद घर दिसताच चोरट्यांनी लांबवला 71 हजारांचा ऐवज

Burglary in broad daylight in Bhusawal : compensation of 71 thousand extended भुसावळ : शहरातील तुकाराम नगरातील स्वामी नारायण मंदीरामागील श्री अपार्टमेंटमधील दीपक प्रल्हाद पाटील यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी मंगळवारी दुपारी 12 ते 2.30 दरम्यान सोन्याच्या दागिण्यांसह 71 हजार 450 रुपयांचा ऐवज लांबवल्याने या भागात खळबळ उडाली आहे.

बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल
शहरातील तुकाराम नगरातील रहिवासी दीपक पाटील हे मंगळवारी बाहेर गेल्याची संधी चोरट्यांनी साधली. चोरट्यांनी कपाटातील सोन्याची दागिणे लांबविले. पाटील घरी आल्यावर चोरीचा प्रकार उघडकीस आला. कारची चाबी, सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याच्या तीन अंगठड्या, कानातील कर्णफुले आदी सुमारे 71 हजार 450 रूपयांचा ऐवज लांबवण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रमण सुरळकर करीत आहेत.