अपुर्ण बांधकामासह परिसरात गाळ साचुन राहिल्यामुळे आरोग्यासह अनेक समस्या

0

नवापुर। नवापुर शहरातील इंदिरा नगर भागातील नाल्याचे व पुलाचे अपुर्ण व निकृष्ठ दर्जाचे बांधकाम व नालासफाई याबाबतचे निवेदन इंदिरानगर व बजरंग चौक येथील सर्व नागरीकांनी नगराध्यक्ष रेणुका गावीत,तहसिलदार प्रमोद वसावे,न.पा मुख्यधिकारी राजेंद्र शिंदे यांना निवेदन दिले. इंदिरानगर व बजरंग चौक या भागात कित्येक महिन्यांपासुन नाल्याच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम असुन सदर कामाचे नियोजनशुन्य असुन भिंत बांधल्यानंतर पावसाळयाआधी नाल्याची साफसफाई करणे,गाळ भरुन फेकला गेला पाहिजे होता. ते अद्याप नाल्यातच पडुन आहे.

सांडपाण्याचा निचरा न झाल्यामुळे परिसरात गाळ
पुलाचे काम चुकीच्या पध्दतीने झालेले असल्यामुळे त्याच्या आजुबाजुला व परिसरात कचरा साचून राहत आहे.तसेच सांडपाण्याचा निचरा न झाल्यामुळे परिसरात गाळ साचुन राहिला आहे.रहिवाशांचा अपुर्ण बांधकामामुळे व परिसरात गाळ साचुन राहिल्यामुळे आरोग्यासह अनेक समस्यांना समोरे जावे लागत आहे.या समस्यांची गंभीर दखल घ्यावी व पत्र प्राप्त झाल्यापासुन 7 दिवसाच्या आंत नागरिकांच्या अडचणी सोडवाव्यात अन्यथा सर्व इंदिरा नगर व बजरंग चौक परिसरातील रहिवासी नागरिक सनदशीलमार्गे आंदोलन करण्यात येईल यामुळे काही प्रशासकीय बाधा निर्माण झाल्यास त्यांची संपुर्ण जबाबदारी नगरपालिका नवापुर प्रशासनाची राहील असे निवेदना मध्ये म्हटले आहे.

यांची होती उपस्थिती
यावेळी नारायण गवांदे,यशवंत जगताप,किसन कोळी,दिनेश भोई,सागर गावीत,अँड जयेश चांदेकर, प्रशांत पाटील, संजय चौधरी,लिला राठोड,सुमन वारुडे,ज्योती चांदेकर,दगु सोनवणे,विमलबाई वरसाळे,मंगला हिरे,सुमन सावळे,उशाबाई सोनवणे,प्रभाबाई पवार,लताबाई सुर्यवंशी,लक्ष्मीबाई कोळी,विजय बागुल,पंकज गोसावी,प्रशांत हिरे,सुनंदाबाई भोई,ललिता वाघ आदी उपस्थित होते

पुलाची अवस्था बिकट
परिणामी पावसाच्या पाण्यामुळे खोलीकरण व सफाई न केल्यामुळे ते पाणी राहत्या घरात येवुन घाण,कचरा,मैला घरात तसेच परिसरात साचलेला आहे.त्यामुळे परिसरात दुर्गंधी व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे.नाल्याच्या कामाचे नियोजन केलेले नसल्याने इंदिरा नगर या परिसरातील पुल हा ओबड धोबड असा पुल बनविण्यात आलेला आहे.सदर पुलाचे पाणी वाहण्यासाठी कोणत्याही प्रकारचा उतार (स्लोप) दिलेला नाही.त्यामुळे नागरिकांच्या वाहनांना ये-जा करण्यात अत्यंत अडचणीचे होत आहे.तसेच पुलाच्याजवळ संरक्षण भीतीचे काम अपुर्ण सोडल्यामुळे नाल्याचे पाणी त्या भागातून परिसरात मोठया प्रमाणावर पसरत आहे.