अपेक्षेप्रमाणे प्रभाग 13 भाजपनेच राखला ; दिग्गजांना फटका

0

जळगाव- प्रभाग 13 मध्ये सर्व जागांवर भाजपने विजय मिळविला आहे. या प्रभागात भाजपाचा पारंपारिक मतदार बहुसंख्येने आहे. त्यातच रिपाइंशी आघाडी असल्याने दलित समाजाची मतेही भाजपकडे वळली व प्रतिस्पर्धी शिवसेनेचे दोघी उमेदवार हे प्रभागाबाहेरचे असल्याने हा त्यांना मोठा फटका बसला तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून संपूर्ण पॅनल उभे केले नव्हते. त्याचाही फायदा हा भाजपलाच झाला. शिवाय जिल्हा परिषदेतील समाज कल्याण सभापती प्रभाकर सोनवणे यांनी या प्रभागाच्या उमेदवारांची धुरा सांभाळली होती. या प्रभागात मनपा स्थायी समिती सभापती नितीन बरडे यांच्या पत्नी संगिता बरडे व विद्यमान नगरसेविका अश्‍विनी देशमुख यांना पराभवाचा फटका बसला.