पिंपरी चिंचवड : प्राधिकरणातील अप्पूघर येथील खेळण्यांची देखभाल दुरूस्ती करण्याच्या सूचना पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर राहुल जाधव यांनी मंगळवारी अधिकार्यांना दिल्या. अप्पूघर येथे महापालिकेच्या वतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी महापौरांनी अप्पूघर उद्यानाची पाहणी केली. त्यावेळी नगरसेविका शर्मिला बाबर, सहाय्यक आयुक्त आशा राऊत, अप्पूघरचे संचालक मेहता तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
खेळण्यांची मागविली माहिती…
हे देखील वाचा
महापौरांनी अप्पूघरची पाहणी केली. त्यावेळेस या ठिकाणी असलेल्या खेळणी खराब झाली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्याची दुरूस्ती करणे, रंगरंगोटी करणे, नवीन खेळणी बसविणे, अप्पूघरमध्ये मुले व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने खेळणी सुस्थितीत ठेवणे, सुरक्षा रक्षकाची नेमणुक करणे, बंद असलेली खेळणी दुरूस्त करुन चालु करणे, उद्यानात वृक्षारोपन करणे, आदी सुचना महापौर राहुल जाधव यांनी अधिकार्यांना दिल्या. तसेच महापालिकेने बसविलेली व ठेकेदारामार्फत बसविलेली खेळण्यांची माहिती मागविली असून अप्पूघर संदर्भात लवकरच बैठक घेण्यात येईल, असे महापौर यांनी सांगितले.