अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांसाठी प्रशिक्षण

0

जळगाव । अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांचे पहिले प्रशिक्षण 23 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. बालकाचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम नुसार अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी 31 मार्च 2019 हा अंतिम दिनांक शासनाने निश्चित केला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व शाळांमधील सर्व प्राथमिक शिक्षकांना कोणत्याही परिस्थितीत 31 मार्च 2019 पर्यंत डीएलएड ही पदविका प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील अनुदानित शाळांतील अप्रशिक्षित शिक्षकांनी 17 सप्टेंबरपर्यंत पत्राद्वारे प्रशिक्षणासाठी संचालक, महाराष्ट्र विद्या प्राधिकरण, पुणे यांच्याकडे अर्ज करावा. या मुदतीत प्राप्त होणारे अर्ज शिक्षणाधिकार्‍यांच्याकडून 21 सप्टेंबरला विभागीय कार्यालयाला सादर करण्यात येतील.