भुसावळ : मध्यप्रदेशातील नेपानगर रेल्वे स्थानकावर अप कर्नाटक एक्स्प्रेस उभी असतानाच एस- 2 डब्यातील चाकांमधून धूर निघाल्यानंतर प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली. रविवारी 11.30 ते 12 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. वाढत्या उन्हामुळे गाडीच्या डब्यातील एक्सल तापल्यामुळे हा प्रकार घडल्याचा कयास आहे. या प्रकारानंतर प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. दरम्यान, गार्ड तसेच नागरीरकांनी पाणी आणि अग्निरोधक यंत्राद्वारे तातडीने आग विझवली.
एक्सल हिट झाल्याने आग
अप 12628 नवी दिली-बेंगरुळु कर्नाटक एक्स्प्रेसच्या एस- 2 डब्यातील चाकांमधून रविवारी दुपारीच्या वेळेस नेपानगर रेल्वे स्थानकावर गाडी उभी असताना धूर निघू लागल्याने डब्याला आग लागल्याची अफवा पसरल्याने गोंधळ उडाला. प्रवासी तातडीने खाली उतरले तर गार्ड यांनी पाहणी केल्यानंतर एक्सल हॉट झाल्याने हा प्रकार घडल्याचे निदर्शनास आले. प्रवाशांसह गार्डने तातडीने पाणी टाकून तसेच अग्निरोधक यंत्राचा वापर केल्याने अप्रिय घटना टळली. या प्रकारामुळे गाडीला दिरंगाई झाली तर मार्गावरील काही गाड्या काही मिनिटांपर्यंत खोळंबल्या.