अप-डाऊन गांधीधाम एक्स्प्रेस रद्द

0

भुसावळ- मध्य रेल्वेच्या भुसावळ स्थानकावर प्री नॉन इंटर लॉकिंग व यार्ड रीमोल्डिंगचे काम वेगात सुरू असून भुसावळ-जळगाव सेक्शनमध्ये तिसर्‍या रेल्वेच्या लाईनसाठीदेखील पॉवर व ट्रॅफिक ब्लॉक 6 ते 19 एप्रिलदरम्यान घेतला जात आहे. रेल्वेच्या विविध कामांसाठी अनेक पॅसेंजर व एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या असून गाड़ी क्रमांक 18501 अप विशाखापट्टनम -गांधीधाम एक्सप्रेस 18 एप्रिल रोजी रद्द करण्यात आली असून डाऊन 18502 गांधी धाम विशाखापट्टनम एक्सप्रेस 21 एप्रिल रोजी रद्द करण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांनी बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.