भुसावळ- हजरत निजामुद्दीत ते नांदेड दरम्यान सुरु करण्यात आलेल्या 02485 व 02486 या दोन्ही गाड्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. 02485 ही गाडी नांदेड येथून 28 फेब्रुवारीपर्यंत दर गुरुवारी रवाना होईल. तर 02486 ही गाडी 23 फेब्रुवारीपर्यंत दर शनिवारी हजरत निजामुद्दीन स्थानकावरुन नांदेडकडे रवाना होणार आहे. या गाडीचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.