अप-डाऊन नागपूर पॅसेंजर 28 दिवसांसाठी रद्द

0

प्रवाशांची गैरसोय ; नागपूर विभागाची रेल्वेची तांत्रिक कामे

भुसावळ- नागपूर रेल्वे विभागात तांत्रीक काम सुरू असल्याने भुसावळ येथून सायंकाळी 7.30 वाजता सुटणारी भुसावळ – नागपूर पॅसेजर गाडी 1 ते 28 फेब्रुवारी या काळात रद्द करण्यात आली आहे. भुसावळ नागपूर आणि नागपूर भुसावळ या दोन्ही मार्गावरील गाड्या रद्द केल्या आहे. दरम्यान, वेस्टन सेट्रल रेल्वे विभागात काही तांत्रीक कामे सुरू असल्याने आणि कुंभमेळ्याला जाणार्‍यांची गर्दी असल्याने सोमवार, 4 भुसावळ-कटनी (51187) पॅसेजर रद्द करण्यात आली आहे. नागपूर विभागातील सेवाग्राम, वर्धा, बडनेरा सेक्शनमध्ये रेल्वेची कामे सुरू असल्याने पॅसेजर रद्द करण्यात आली आहे. तब्बल महिनाभर नागपूर पॅसेजर रद्द करण्यात आली असल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे.