वर्धा, बडनेरा सेक्शनमध्ये तांत्रिक कामे होणार
भुसावळ- नागपूर रेल्वे विभागात सेवाग्राम, वर्धा आणि बडनेरा सेक्शनमध्ये तांत्रिक कामामुळे 1 ते 28 फेब्रुवारीदरम्यान अप व डाऊन मार्गावरील नागपूर पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे. अप गाडी क्रमांक 51286 नागपूर-भुसावळ व डाऊन भुसावळ-नागपूर पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांनी गैरसोयीबाबत दखल घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.