अप- डाऊन प्रकरणाची होणार चौकशी

0

रावेर । पंचायत समिती अधिकार्‍यांच्या अप-डाऊनला जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी अस्थितकुमार पांडेय यांनी ब्रेक लावलेला आहे मागील अनेक महिन्यांपासून गटविकास अधिकार्‍यांपासुन निम्मे कर्मचारी सोईच्या ठिकाणा वरुन अप-डाऊन करत असल्याचे वृत्त दैनिक जनशक्ती मध्ये प्रसिध्द झाल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने याची दखल घेतलेली आहे.

येथील गटविकास अधिकारी तसेच इतर कर्मचारी सर्रास अप-डाऊन करतात. यामुळे ग्रामीण भागातून आपला रोजगार सोडून आलेल्या ग्रामस्थानच्या अपेक्षाभंग होऊन निराश जावे लागत होते अशा पध्दतीचा प्रकार मागील अनेक महिन्यांपासून सुरु आहे या अप-डाऊनच्या पडद्यावर फ्लॅश करताच या सर्व प्रकरणाची चौकशी सुरु झालेली आहे.

अधिकारी गायब असल्यामुळे ग्रामस्थांची हिरमोड
येथील अप-डाऊनच्या अजब फंड्यामुळे कार्यालयात कर्मचारी, अधिकारी मिळत नसत. त्यामुळे ग्रामस्थांचा मोठे अपेक्षाभंग होऊन निराश होऊन परतावे लागत असे. तासन्तास अधिकार्‍यांच्या कॅबिनसमोर ठिय्या मांडावे लागायचा परंतु अखेर निराश होऊन त्यांना परत जावे लागत असे.

अप-डाऊन प्रकरणाची चौकशी
पंचायत समिति कार्यालयातुन कोण अप-डाऊन करतो या प्रकरणाची चौकशी करतो ग्रामीण भागातील जनतेचा अपेक्षाभंग होत असेल तर याची काळजी घेतली जाईल असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अस्थितकुमार पांडेये यांनी जनशक्तीला सांगितले.

कर्मचार्‍यांसह स्वतः करत असलेल्या अप-डाऊन संदर्भात येथील गट विकास अधिकारी सानिया नाकाडे यांची प्रतिक्रीया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता यावर कमालीची चुप्पी साधली आहे. गटविकास अधिकार्‍यांच्या या स्टँडने अप्रत्यक्ष अप-डाऊन दुजोरा मिळतो.