पुणे-भुसावळ एक्स्प्रेसच्या मार्गातही बदल ; काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट तर काही गाड्या उशिराने धावणार
भुसावळ- ईगतपुरी येथे इंटरलॉकींग पॅनलसह यार्ड रीमॉडलिंगची कामे करण्यासाठी विशेष टॅ्रफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात आला असून अप-डाऊन मुंबई पॅसेंजरसह गोदावरी एक्स्प्रेस 23 ते 26 ऑक्टोबर दरम्यान रद्द करण्यात आली असून पुणे-भुसावळ हुतात्मा एक्स्प्रेसच्या मार्गातही बदल करण्यात आला आहे तर काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट तसेच काही गाड्या उशिराने धावणार असल्याने रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.
या गाड्या चार दिवसांसाठी रद्द
23 ते 26 ऑक्टोबर दरम्यान 12117 एलटीटी-मनमाड व 12118 मनमाड-एलटीटी दरम्यान धावणारी गोदावरी एक्स्प्रेस तसेच 51153 मुंबई-भुसावल व 51154 भुसावल-मुंबई सवारी (पॅसेंजर) गाडी रद्द करण्यात आली आहे.
या गाड्यांचा मार्गात बदल
23 रोजी सुटणारी 11025 भुसावल-पुणे एक्सप्रेस वाया दौंड-मनमाडमार्गे धावेल तर 11026 पुणे-भुसावल एक्सप्रेस वाया मनमाड-दौंड धावणार आहे.
अनेक गाड्या धावणार उशिराने
11055 लोकमान्य तिलक टर्मिनस-गोरखपुर एक्सप्रेस एलटीटीवरून 10.55 ऐवजी एक वाजता सुटेल तर 12542 लोकमान्य तिलक टर्मिनस-गोरखपूर एक्सप्रेस एलटीटीवरून 11.10 ऐवजी 1.20 वाजता तसेच 12362 मुंबई- आसनसोल एक्सप्रेस मुंबईहून 11.05 ऐवजी 1.30 वाजता सुटेल. 22 रोजी सुटलेली 13201 राजेंद्रनगर-लोकमान्य तिलक टर्मिनस एक्स्प्रेस ठाणे स्थानकावर ठाणे स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट केली जाईल तसेव 22511 लोकमान्य तिलक टर्मिनस-कामाख्या एक्सप्रेस खर्डी स्टेशन पर एक तास 40 मिनिटांसाठी थांबवली जाईल. ब्लॉकमुळे डाऊन मार्गावरील मेल, एक्स्प्रेस गाड्या 45 मिनिटे ते एक तासांपर्यंत उशिराने धावतील. 12071 दादर-जालना जनशताब्दी एक्सप्रेस नेहमीच्या वेळेपेक्षा 50 मिनिटे उशिराने धावेल. 12142 पाटलीपुत्र-लोकमान्य तिलक टर्मिनस एक्सप्रेस, 82355 पटना-मुंबई सुविधा एक्सप्रेस, 11056 गोरखपुर- लोकमान्य तिलक टर्मिनस एक्सप्रेस एवं 15018 गोरखपुर- लोकमान्य तिलक टर्मिनस एक्सप्रेस वाया इलाहाबाद या गाड्या भुसावळ विभागात थांबवल्या जातील शिवाय नियोजित स्थळी त्या उशिराने पोहोचतील.