भुसावळ- 22827 अप पुरी-सुरत एक्स्प्रेसमधील एस- 1 बोगीतून दहा किलो गांजा जप्त करण्यात आल्याची घटना शेगाव-मलकापूरदरम्यान सोमवारी रात्री घडली. या प्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करून तो शेगाव लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. पुरी एक्स्प्रेसमधील बोगी क्रमांक एस- 1 मध्ये प्रवाशांकडील तिकीटाची तपासणी करीत असताना तिकीट यशवंत रामदास कुलकर्णी यांना एक बेवारस बॅग पडून असल्याचे प्रवाशांनी सांगितल्यानंतर त्यांनी ती उघडून पाहिली असता त्यात गांजा आढळल्याने त्यांनी भुसावळ आल्यानंतर लोहमार्ग पोलिसांकडे हा गांजा जप्त केला. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपासार्थ हा गुन्हा शेगाव लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.