अप मंगला एक्स्प्रेसमधून 15 हजारांची रोकड लंपास

0

भुसावळ- 12618 अप मंगला एक्स्प्रेसच्या ए- 2 डब्यातून चोरट्यांनी भुसावळ स्थानक येण्यापूर्वी 15 हजारांची रोकड लांबवली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी अतुल कुमार राजेंद्रप्रसाद शर्मा (38, विवेकानंद कॉलनीजवळ, शिवपूरी, मुंबई) हे अप मंगला एक्स्प्रेसमधून पत्नीस- ग्वाल्हेर ते जळगाव असा प्रवास करीत असताना रविवारी पहाटे तीन ते चार वाजेच्या सुमारास त्यांच्या पत्नीच्या पर्समधून चोरट्यांनी 15 हजारांची रोकड लांबवली. नाशिक लोहमार्ग पोलिसांकडून हा गुन्हा भुसावळ लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. तपास हवालदार रवींद्र पाटील करीत आहेत.