अप मुंबई मेलमधून लाखोंचा गांजा जप्त ; लोहमार्ग पोलिसांची कारवाई

0

चाळीसगाव लोहमार्ग पोलिसात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

चाळीसगाव- अप मुंबई मेल एक्स्प्रेसच्या बोगी क्रमांक एस- 4 मधून लाखो रुपये किंमतीचा बेवारस गांजा चाळीसगाव लोहमार्ग पोलिसांच्या गस्ती पथकाने जप्त केला. ही कारवाई बुधवारी पहाटे गाडीने जळगाव स्थानक सोडल्यानंतर चाळीसगावदरम्यान करण्यात आली. सुमारे 13 किलो वजनाचा हा गांजा असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत लाखो रुपयांच्या घरात आहे. लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पेट्रोलिंगवर असलेल्या कर्मचार्‍यांनी ही कारवाई केली.