अफगाणिस्तानातील दहशतवादी तळांवर पाकचा हल्ला

0

नवी दिल्ली : पाकिस्तानमधील लाल शहबाज कलंदर दर्ग्यावर शुक्रवारी रात्री आत्मघातकी हल्ला झाला होता. यामध्ये 88 जणांचा मृत्यू झाला. हा हल्ला अफगाणिस्तानून आलेल्या दहशवाद्यांनी केल्याचे पाक लष्कराने जाहीर केले होते. लागलीच पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या दुतावासातील अधिकार्‍याला बोलावून 76 दहशतवाद्यांची यादी देऊन या अतिरेक्यांचा हल्ल्यामध्ये हात असल्याचे म्हटले होते. यानंतर पाकने अफगाणिस्तानमध्ये आपले सैनिक घुसवून तेथील दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ले केले.

उपकमांडरसह अनेक दहशतवादी ठार

जिओ टीव्हीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, जमात उल अहरारच्या चार तळांवर पाक सैन्यांनी हल्ले केले आहेत. तर अफगाणिस्तानमधील माध्यमांनी, पाकिस्तानी सैन्याच्या हल्ल्यात अहरारचा उपकमांडरसह अनेक दहशतवादी मारले गेले. अफगाणिस्तानने देशाच्या पूर्व भागात झालेल्या गोळीबारप्रकरणी पाकिस्तानच्या राजदूताला समन्स बजावले आहे, असे म्हटले आहे.

अधिकृत दुजोरा नाही

दर्गात आत्मघातकी हल्ल्या झाल्यानंतर पाकिस्तानने लगेच हा हल्ला केल्याचे अफगाणिस्तानमधील दहशतवाद्यांनी म्हटले आहे. पाकच्या या हल्ल्यानंतर दोन्ही देशातील संबंधात तणाव निर्माण होण्याची दाट शक्यता असून जिओ टीव्हीने सैन्य दलातील सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार अफगाणिस्तानमधील दहशतवादी तळांवर काल रात्री हल्ले करण्यात आले. परंतु या बाबत अधिकृतरित्या काहीही सांगण्यात आलेले नाही.