लंडन । आयसीसी आज आपल्या बैठकीत महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तान याला पुर्ण सदस्य झाल्याचे जाहिर केले. ज्यामुळे अफगाणिस्तान व आयर्लंड यांना अनुक्रमे 11 वे व 12 वे देश म्हणून कसोटी सामन्यांचा दर्जा मिळाला आहे. अफगाणिस्तान यांनी गेल्या काही काळात सर्वोत्तम प्रदर्शन केले आहे.
अफगाणिस्तान संघाचा मुख्य लेग स्पिनर राशिद याने टी-20 फ्रेचाईजी लीग स्पर्धा आयपीएल मध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे.काही दिवसापुर्वी एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजला पराभूत करून 1-1 ची बरोबरी केली होती. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी शफिक स्टैनिकजई म्हणाले की, आयसीसी बोर्डाच्या सदस्यांचे धन्यवाद करित म्हणाला की, अफगाणिस्तान सारख्या देशासाठी सर्वात मोठी उपलब्धी आहे. संपुर्ण देश आनंदत्सव मनवले. ही ईदची सर्वात चांगली भेट आहे.आयसीसी के मुख्य कार्यकारी अधिकारी डेविड रिचर्डसन म्हणाले की अफगाणिस्तान आणि आयलैंड या देशाच्या संघांना संपुर्ण सदस्यांचा दर्जा मिळाल्याबद्दल त्याचे अभिनंदन. त्यांनी मौदानावी व मैदानाबाहेरचे चांगले प्रदर्शनमुळे हे सर्व झाले आहे.