काबूल-काबूल-अफगाणिस्तामधील पश्चिमेकडील भागात पोलिसांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 20 पोलिसांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रांतीय परिषदेचे सदस्य दादुल्लाह कानेह यांनी अफगाणिस्तामधील पश्चिमेकडील फराह प्रांतात तालिबान या दहशतवादी संघटनेने हल्ला केला अशी माहिती दिली आहे. पोलिसांचा ताफा नवनियुक्त पोलीस अधिकाऱ्यांची ओळख करुन देण्यासाठी जात होता. त्यावेळी तालिबानी दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये नवनियुक्त पोलीस अधिकाऱ्याचाही मृत्यू झाला आहे.
दरम्यान, तालिबान या दहशतवादी संघटनेने पोलिसांवर केलेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दुसरीकडे काबूलमध्ये राहणाऱ्या अल्पसंख्यक शिया समुदायाच्या प्रमुखाला अटक केली आहे. या अटकेच्या निषेधार्थ गेल्या दोन दिवसांपासून याठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे.