अफगाणी राशिद प्रसिध्दी झोतात

0

नवी दिल्ली । इंडियन प्रीमिअर लीगच्या 10 वर्षाच्या ईतिहासात प्रथमच कोणी अफगाणिस्तानी खेळाहू राशिद खान हा सनराइजर्स हैदराबाद कडून खेळत आहेत.त्याचा प्रथमच आयपीएलमध्ये सहभाग झाला असून तो भारतीय क्रिकेट चाहत्यामध्ये प्रसिध्द झाला आहे.अफगाणि युवा गोलंदाज राशिद ने आपल्या फिरकीने अनेक दिग्गंज खेळाडूंना गुडघे टेकायला लावले आहे.राशिद आयपीएलमधील आतापर्यंतचे सामने खेळला असून त्याने 6 फलंदाज बाद करून पर्पल टोपीच्या यादीत अव्वल क्रमाकांवर आहे.आपल्या गोलंदाजीच्या जोरावर त्याने चाहत्याच्या मनात एक आगळेवेगळे स्थान मिळविले आहे.त्याचबरोबर तो त्याच्या जीवनातील सहा कारणांनी प्रसिध्दी झोतात आला आहे.

क्रिकेट खेळण्याची सुरवात रस्त्यावर
राशिद लहान असतांनाच क्रिकेट खेळणे खुप आवडायचे. तो रस्त्यावर आपल्या भावडांसह खेळत असे.हळू हळू तो प्रसिध्दी झोतात आला. अंडर -19 क्रिकेट चषकातील 6 सामन्यात 10 फलंदाज बाद करून तो प्रसिध्दी झोतात आला.

आयपीएल इतिहासात प्रथम घडले
फलंदाजांना चकवित राशिद खानने 3 फलंदाजांना पायचित आऊट केले. जो को एक विक्रम आहे. आयपीएलच्या इतिहासात कोणताच गोलंदाज आजपर्यंत 3 फलंदाजांना पायचित बाद करू शकलेला नाही.

अंडर-19 आणि वरिष्ठ संघाचे नेतृत्व केले आहे
20 सप्टेंबर 1998 रोजी राशिदचा जन्म झाला.अफगाणिस्तानच्या अंडर -19 व वरिष्ठ संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. अफगाणिस्तान संघाचा सदस्य असल्याने राशिदची कामगिरी कोणाच्या लक्षात येत नाही.

एकदिवसीय सर्वोत्तम प्रदर्शन
एकदिवसीय सामन्यात त्याने 22 च्या सरासरीने 286 धावा केल्या आहे.त्यामध्ये सर्वाधिक धावा नाबाद 60 आहे.19.58च्या सरासरीने त्याने 31 बळी घेतले आहे. यात 21 धावा देवून 4 बळी घेतल्याचे सर्वोत्तम कामगिरी आहे.

गोलंदाजी बरोबर फलंदाजीत ही तरबेज
21 टी-20 सामन्यात राशिदने 16.06 सरासरी 31 बळी घेतले आहे. 11 धावा देवून तीन बळी घेतल्याचे सर्वोकृष्ट प्रदर्शन आहे.टी-20 सामन्यात 6 पारित तो चारवेळा नाबाद राहिला आहे.त्याने 31.50 सरासरीने 63 धावा काढल्या आहे.सर्वात महत्वाचे एक दिवसीय सामन्यात फलंदाजीची सरासरी 100 आणि टी-20 मध्ये 157.50 स्ट्राईक रेट आहे.

सर्वात कमी वयात टि-20 पर्दापण केले
अफगाणिस्तानच्या राशिदने आपल्या छोट्याश्या क्रिकेट करीयर मध्ये आपल्या क्रिकेट कौशल्याने अनेकांना प्रभावित केले आहे. तो उजव्या हाताने लेग ब्रेक गोलंदाज आणि फलंदाज आहे. सनराइजर्स हैदराबादचा खेळाडू राशिद खान हा फक्त 18 वर्षाचा आहे.त्याने 17 वर्षी अफगाणिस्तान देशासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पर्दापण केले होते. राशिद खान अफगाणिस्तान कडून सर्वात कमी वयात पर्दापण करणारा खेळाडू आहे.ऑक्टोबर 2015 मध्ये वनडे पर्दापण नंतर 7 दिवसांनी त्योन झिम्बाबे विरूध्द पहिला टी-20चा सामना खेळला.