शहादा । परीसरात अफवामुळे व नागरीकामध्ये निर्माण झालेल्या गैरसमजामुळे सप्तपर्णी वृक्षाची तोड केली जात असल्याचा प्रकार उजेडात आल्याने वनविभागाच्या अधिकार्यांसमोर आवाहन ठरणार आहे. सप्तपर्णीवृक्षाला जी फुल येतात व बिया निर्माण होतात व फुलांना पाकळ्या असतात ते हवेत इतरत्र उडतात त्या पाकळ्या बारीक केसासारख्या असतात त्यानाकावाटे शरीरात जातात. त्यामुळे जिवघेणा आजार निर्माण होतो. असा गैरसमज नागरिकांचा झाला आहे. ही अफवा पसरल्यामुळे खेतीया रस्त्यावरील मुरली मनोहर कॉलनी, मलोणी भागात खेतीया रस्त्याला लागुन असलेल्या नवीन वसाहतीतही झाडे मुळासकट तोडण्यात आली आहे. याचा परिणाम इतर वसाहतीवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोणतेही वृक्ष असो त्यामुळे आजार होत नाही
वनविभागाच्या वरिष्ठ अधिकार्यानी प्रत्यक्ष त्या ठिकाणी भेट देवुन चौकशी करावी. नागरिकामध्ये झालेला गैरसमज दुर करणे गरजेचे आहे. अन्यथा अफवाना मोठया प्रमाणात ऊत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. वन विभागाने जागृती करणे आवश्यक आहे.एका बाजुला शासन झाडे लावण्यासाठी शासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात उपक्रम राबवत आहे. यावर्षी शासनाने चार कोटी वृक्षाची लागवड केली आहे. विविध सेवाभावी सस्था शिक्षण सस्था संघटनाचा सहभाग घेतला आहे. अश्या परिस्थितीत दुसर्या बाजुला गैरसमजातुन होत असलेली वृक्ष तोड ही वनविभागाला आवाहन ठरणार आहे. कोणतेही वृक्ष असो त्यामुळे आजार होत नाही. आजपर्यंत असा प्रकार घडला नाही. त्यामुळे वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज आहे हे सर्वश्रृत आहे.