अफव्यावरून केंद्रीय मंत्री राजीनामा देतील का?; संजय राऊत यांचा सरकारला सवाल

0

नवी दिल्ली: शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी व कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) हे तीन वादग्रस्त विधेयक लोकसभेत मांडण्यात आले. त्याला लोकसभेत मंजुरी मिळाली आहे. लोकसभेच्या मंजुरीनंतर आज रविवारी २० रोजी राज्यसभेत हे विधेयक मांडण्यात आले. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी विधेयक मांडल्यानंतर विधेयकावर चर्चा करताना विरोधी पक्ष आक्रमक दिसून आले. जोरदार घमासान पाहायला मिळाले. दरम्यान शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनीही विधेयकावरून सरकारला लक्ष केले. लॉकडाऊनच्या काळात संपूर्ण देश बंद होते, त्याकाळात शेतकरी शेतात घाम गाळत होता, म्हणून आज अन्न खायला मिळत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा दावा करत सरकारने हे विधेयक आणले आहे. या विधेयकानंतर शेतकऱ्यांचे उत्त्पन्न खरेच दुप्पट होईल का? हे विधेयक मंजूर झाल्यानंतर शेतकरी आत्महत्या होणार नाही? असे आश्वासन सरकारने द्यावे असे संजय राऊत यांनी सांगितले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधेयकाबाबत काही अफवा पसरवल्या जात  असल्याचे सांगितले जात आहे. त्यावरूनच संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. या विधेयकावरून एनडीएचा घटक पक्ष असलेल्या अकाली दलच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा दिला. जर अफवा असेल तर केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिला असता का? असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला आहे.

शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी ही दोन विधेयक केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी राज्यसभेत मांडली. या विधेयकांवर चर्चा करताना विरोधी पक्षांच्या खासदारांनी भूमिका मांडली.