मुंबई : बीसीसीआय टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकासह अन्य महत्त्वाच्या पदांसाठी अर्ज मागवले होते. अर्ज करण्याची मुदत संपली आहे. परंतु भारतीय संघाचे प्रशिक्षक होण्यासाठी रांग लागल्याचे दिसून येते. कारण मुख्य प्रशिक्षकपदासाठी जवळपास 2000 अर्ज आले आहेत.
या पदासाठी ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू टॉम मूडी यांच्यासह न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माईक हेसन, भारताचा माजी खेळाडू रॉबीन सिंग आणि भारताचे माज व्यवस्थापक आणि झिम्बाब्वे संघाचे प्रशिक्षक लालचंद राजपूत हे प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. त्याशिवाय भारताचे माजी कसोटीपटू प्रविण आम्रे यांनीही फलंदाजी प्रशिक्षक, तर दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू जाँटी ऱ्होड्सने क्षेत्ररक्षक प्रशिक्षकपदासाठी अर्ज केले आहेत. श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धनेनं आतापर्यंत अर्ज न केल्याचे बोलले जात आहे.