अबब… आजपर्यंत इंग्लंडने खेळले इतके कसोटी सामने

0

लंडन –भारतीय संघ हा सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील टी-२० मालिका भारताने जिंकली आहे तर एकदिवसीय मालिका इंग्लंडने जिंकली आहे. आता १ ऑगस्टपासून भारत-इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामने खेळण्यात येणार आहेत. त्यातील पहिला कसोटी सामना १ ते ५ ऑगस्ट दरम्यान होणार आहे. या कसोटी सामन्यात इंग्लंडचा संघ एक अचाट विक्रम करणार आहे.

भारताविरुद्ध १ आॅगस्टला इंग्लंडचा संघ आपला १००० वा कसोटी सामना खेळण्यासाठी उतरणार आहे. इंग्लंडच्या संघाने आतापर्यंत एकूण ९९९ कसोटी सामने खेळले आहेत. त्यामुळे भारताविरोधातील मालिकेतील पहिला सामना हा त्यांचा हजारावा सामना असणार आहे.

इंग्लंड-आॅस्ट्रेलिया या दोन दिग्गज संघांमध्ये १५ मार्च १८७७ ला पहिला कसोटी सामना खेळण्यात आला होता. तो क्रिकेटच्या इतिहासातील पहिला अधिकृत कसोटी सामना मानला जातो. इंग्लंडचे कर्णधार जेम्स लिलिव्हिटेंजर यांच्या नेतृत्वाखालील इंग्लंडच्या संघात या सामन्यात आॅस्ट्रेलियाकडून ४५ धावांनी पराभूत व्हावे लागले होते. तेथूनच आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात झाली.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत एकूण २०१३ कसोटी सामने खेळले गेले आहेत. त्यात इंग्लंडने सर्वाधिक ९९९ सामने खेळले आहेत. तर आॅस्ट्रेलिया ८१२ कसोटी सामन्यांसह दुसऱ्या, विंडीज ५३५ सामान्यांसह तिसऱ्या आणि भारत ५२२ सामन्यांसह चौथ्या क्रमांकावर आहे. याशिवाय, दक्षिण आफ्रिकेने ४२७, न्यूझीलंडने ४२६, पाकिस्तानने ४१७, श्रीलंकेने २७४, बांगलादेशने १०८, झिम्बाब्वेने १०५ तर अफगाणिस्तान व आयर्लंडने प्रत्येकी १ सामना खेळला आहे.